देश-विदेश

सकल मुस्लिम समाज तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती वर मशिदी वरून केली पुष्पवृष्टी, राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे घडले दर्शन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

*छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीनिमित्त *सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा* यांच्या वतीने *जामा मस्जिद करमाळा* येथे शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेली मिरवणूक जामा मस्जिद येथे आली असता मुस्लीम समाज बांधवांकडुन दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी सकल मराठा समाज करमाळा व शिवजयंती उत्सव समिती चे सदस्य सचिन भाऊ काळे , विजय भाऊ लावंड, संजय पप्पू सावंत, सुनील (बापू ) सावंत, अमोल भाऊ यादव, सचिन भाऊ घोलप, विनय काका ननवरे, सुरज वांगडे , महादेव आण्णा फंड, भोजराज दादा सुरवसे , सचिन गायकवाड ( मालक ) , आरुण काका जगताप, पप्पू कसाब व सकल मुस्लीम समाज करमाळा चे जमीर भाई सय्यद, रमजान भाई बेग, आझाद भाई शेख, जहाँगीर भाई बेग, दिशान भाईजी कबीर, फिरोज बेग, मुस्तकीम पठाण, शाहरुख नालबंद,आरबाज बेग, शाहीद बेग, शोयब बेग, अलतमश सय्यद, आलिम सय्यद, वसीम सय्यद व असंख्य मुस्लीम व हिंदु बांधव उपस्थित होते यावेळी करमाळा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी दोन्ही समाजातील लोकांचे अभिनंदन करुन सामाजिक एकोपा व बंधुभाव, एकात्मता कायम टिकून राहण्यासाठी असाच सलोखा कायम राहिला पाहिजे असे आवर्जून सांगितले आहे.जामा मशीद ट्रस्ट, मुस्लिम सकल समाज करमाळा तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी गणेश विसर्जन या दिवशी देखील मशिदी वरून फुलांचा वर्षाव केला जातो याशिवाय शिवजयंती निमित्त देखील मुस्लिम बांधवांनी मिरवणूक जामा मशीद जवळ आल्यानंतर मशिदी वरून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प वृष्टी करीत राष्ट्रीय एकात्मतेचे एक आगळे वेगळे दर्शन घडविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button