शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
विधानसभा निवडणुकीचा जाहिर प्रचार संपल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदार संघातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगरमध्ये बॅनर लावून प्रचार केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे मशाल चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवणारे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेचे कलम 126 (1) (2) (3) आणि लोक प्रतिनिधी अधिनियम सन 1951 अंतर्गत हा गुन्हा बोईसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
बोईसर सरावली ग्रामपंचायत हद्दीतील पूर्व अवधनगरच्या अजमेरी गल्लीमध्ये विधानभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर ही डॉ. विश्वास वळवी यांचा फोटो नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले असलेले प्रचारासाठी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले नाही. बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया सुरु असण्याच्या काळात प्रचाराला बंदी लागू असताना बोईसर विधानसभा मतदार संघातील शिवसेनाउध्दव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांनी प्रचाराचा बॅनर लावून पक्षाचा प्रचार केल्याचे सिद्ध झाले आहे यावरून सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांनी डॉ. विश्वास वळवी आणि अज्ञात इसमाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विश्वास वळवी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 126 (1) (2) (3) आणि लोक प्रतिनिधी अधिनियम सन 1951 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हा बॅनर लावणाऱ्या अज्ञात इसमाचा बोईसर पोलीस कसून शोध घेत आहेत..



