सफाळे पोलीस ठाणे हद्दीत विधानसभेचे मतदान शांततेत पडले पार.. लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या शिलटे गावाने पोलिसांचा जनजागृती मुले केले 82% मतदान
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640.
पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदार संघ हद्दीतील सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी, मांडे,माकणे,सफाळे,तांदूळवाडी, पारगाव,नावजे, शिलटे नवघर, घाटीम,कपाशे,लालठाणे अशा 51 मतदान बूथ केंद्रावर अत्यंत शांतपणे बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान पार पडले .
यावेळी नागरिकांनी मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद देत 20 मे 2024 रोजी लोकसभेच्या निवडणूकी वर बहिष्कार टाकून मतदान न करणाऱ्या सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील शिलटे गावात जाऊन या गावातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून आपला हक्क बजावण्यासाठी सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके आणि सफाळे पोलिसांनी जनजागृती करून मतदानाच्या हक्काचे महत्व पटवून दिल्यावर
या गावातील ग्रामस्थांनी आपला मतदानाचा हक्क बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पूर्णपणे जबाबदारीने पार पडून 82% मतदान केले आहे.
यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्ती यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यांच्या सेवेसाठी सफाळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सज्ज झाले होते.विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा, गुजरात, मुंबई पालघर असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.