शहर

माहेरी जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून सासरी परत येत असताना सफाळे रेल्वे रूळ क्रॉस करताना एका 26 वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सासरहून आपल्या माहेरी जाऊन मतदान करून घरी परत येत असताना रेल्वे क्रॉसिंग करताना एका (26) वर्षीय महिलेचा अपघात होऊन तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे प्लॅटफॉर्म जवळ घडली आहे.

जुई सुजन भोईर वय वर्ष (26) ही विवाहित महिला बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी तिचे सासर केळवारोड भरणेपाडा सफाळे इथून मतदान करण्यासाठी तिची आई राहत असलेल्या सफाळे नवघर या माहेरच्या गावात गेली होती.

या गावातील मतदान बूथवर मतदान करून ती आईकडून आपल्या सासरी जाण्यासाठी सफाळे पश्चिम येथून पूर्वेकडे असलेल्या सफाळे एक नंबर रेल्वे प्लॅटफॉर्म कडे रेल्वे रूळ ओलाडून दुपारी 3.30 वाजता जात होती. यावेळी मुंबईहून गुजरात कडे जाणारी गौरव एक्सप्र भरधाव वेगाने येत असताना या गाडीखाली तीचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक तपास पालघर रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button