शहर

वेध विधानसभा निवडणुकीचा..कोण होणार बोईसर मतदार संघाचा आमदार…राजेश पाटील की विलास तरे

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदार संघाचा आमदार कोण ? राजेश पाटील, विलास तरे की डॉ. विश्वास वळवी या तिन्ही उमेदवारांना मी होणार आमदार…असा जरी विश्वास असला तरी या तिघांपैकी एकच आमदार होणार हे तर निश्चित आहे मग….

कोण होणार आमदार बोईसर मतदारसंघाचा ?
बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक पार पडली आहे . या पैकी बोईसर मतदारसंघातील 60. टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

हे मतदान मतदाराने कोणत्या उमेदवाराला केले असा प्रश्न ? तुम्हाला पडला असेल तर सर्वत्र जनसामान्यांमध्ये राजेश पाटील आणि विलास तरे या दोन नावांची सर्वत्र चर्चा आहे.मग डॉक्टर विश्वास वळवी कुठे तर ते तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे.

मग पहिल्या क्रमांकावर कोण ?

असा प्रश्न जनसामान्यांना विचारला असता त्यांनी राजेश पाटील या नावाला प्रथम प्राधान्य दिले आहे.
यामागचे कारण जनसामान्यांना विचारले असता राजेश पाटील आमदार असताना त्यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात विकास कामे केली आहेत.तसेच प्रचारादरम्यान प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन त्यांनी लहान थोरांचे आशीर्वाद घेऊन माणुसकीचे दर्शन घडवून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे त्यांना आश्वासन दिले आहे.

तसेच त्यांना अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पाठिंबा देऊन अनेक लोकांना या राजकीय पुढाऱ्यांनी राजेश पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
तसेच माजी खासदार आणि या निवडणुकीला पालघर विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी राजेश पाटील यांना गोपनीय पद्धतीने पाठिंबा देऊन त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेक कार्यकर्त्या आणि चाहत्यांना शिटी या चिन्हावर मतदान करण्यासाठी इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

कारण लोकसभा निवडणुकीला भाजपने राजेंद्र गावित यांचा पत्ता कट केला होता यामागचे एकमेव कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्षपद भरत राजपूत असल्याचे बोलले जात आहे.म्हणून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राजेंद्र गावित यांनी स्वबळावर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून पालघर विधानसभेची उमेदवारी पटकावली आहे.

तर भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा चाहता लाडका उमेदवार म्हणजे विलास तरे बोईसर विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक लढवत आहेत .
विलास तरे हे शिवसेना,बहुजन विकास आघाडी, भाजप, आणि आता एकनाथ शिंदे शिवसेना गट असा त्यांचा आतापर्यंतचा पक्ष बदलू राजकीय प्रवास आहे.

यामुळे सहाजिकच राजेंद्र गावित आपला सूड घेणारच हे सर्व प्लस पॉइंट असल्यामुळे राजेश पाटील यांचा विजय जरी निश्चित होणार असल्याचे भाकीत जरी वर्तवले जात असले तरी हम भी कुछ कम नही भाजप शिवसेना शिंदे गट एक हे तो सबका विकास है..हमारी लाडली बहन और हमारा लाडला भाई हमारे साथ है या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली आहे.

आणि त्यांना केळवा रोड पूर्व , सफाळे विटी लाईन पश्चिम , आणि सफाळे पूर्व येथील अनेक गावांसह बोईसर आणि विरार हायवे लगत असलेल्या अनेक गावातून भरघोस मतदान केल्याचे बोलले जात आहे.यामुळे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट भाजप युतीचे उमेदवार विलास तरे या दोन उमेदवारांमध्ये जिगरी अटीतटीचा सामना कोणाची चिन्ह दिसत आहेत.

तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे डॉ. विश्वास वळवी यांचा जनसंपर्क या भागात कमी असल्यामुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक पालघर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे या निवडणुकीदरम्यान त्यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट दिसून आले नाही जरी असे असले तरी अखेर शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button