करमाळा विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांचा 16000 मताधिक्याने विजयी मावळते आमदार संजय मामा शिंदे यांचा दारुण पराभव
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा विधानसभे करिता आज झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये अखेर माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी विजयाची बाजी मारली आमदार पाटील हे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मार्फत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यांना 96 हजार 91 अशी मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार संजय मामा शिंदे यांना ८०००६ मध्ये पडली तर महायुती चे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार तसेच माजी सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल यांचे चिरंजीव दिग्विजय बागल यांना 40,541 मते पडली आमदार नारायण आबा पाटील यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा 16019 मतांनी पराभव केला करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी अजितदादा पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव केला आहे. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी राहिले आहेत. पाटील हे 16 हजार 19 मतांनी विजयी झाले आहेत.
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांचा पाठींबा काढत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने पाटील यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली होती. पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली ती शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. महायुतीचे उमेदवार बागल हे दहाव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानी होते. या फेरीनंतर शिंदे हे दुसऱ्या स्थानी आले मात्र ते पाटील यांना गाठू शकले नाहीत. करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यात ते पिछाडीवर राहिले.
शिंदे यांच्यावर माढा तालुक्यातील ३६ गावात रोष असल्याचे नेरिटिव्ह पाटील गटाने तयार केले. ते घालवण्यात शिंदे अपयशी ठरले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला. तेव्हा करमाळ्याचे नारायण पाटील यांनीही पाटील गटात प्रवेश केला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
संजयमामा शिंदे यांनी ३ हजार ४९० कोटीच्या निधीचा विकास केला यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले मात्र पाटील यांनी त्यावर केलेल्या चालीत शिंदे अयशस्वी झाले. जगताप यांनी पाटील यांना पाठींबा देताच शिंदेंवर टीकास्त्र सुरु केले होते. त्यावर शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे, विलास पाटील यांनी वेळोवेळी उत्तर दिले मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही हे निकालावरून दिसले आहे
आज झालेल्या मतमोजणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांनी बाजी मारीत यश संपादन केले त्यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मावळते आमदार संजय मामा शिंदे यांचा दारुण पराभव केला
नारायण आबा पाटील हे विजयी होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मूळ गावी जेऊर येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला
चौकट घेणे
माझ्या यशामागे सर्वसामान्य कार्यकर्ता,,,,,,,,,,,,,,,,,,,,
माझ्या यशामागे सर्वसामान्य कार्यकर्ता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच माझे जुन्या काळातील राजकीय सहकारी माजी आमदार जयवंतराव उर्फ राजाभाऊ जगताप सावंत गटाचे तिन्ही बंधू यांनी मला निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांची मी शतशः आभार मानतो असे नवनिर्वाचित आमदार नारायण आबा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मत व्यक्त केले