पालघर विधानसभेवर राजेंद्र गावित आणि बोईसर विधानसभेवर विलास तरे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा झेंडा.. तर वसई नालासोपारा मध्ये बविआ चे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचा पराजय
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धनुष्यबाण आणि भगवा आमचा आहे. शिवसेना आमची आहे. आमचे विचार स्वर्गीय बाळासाहे ठाकरे यांचे आहेत.
पालघर जिल्हा शिवसेनेचा आहे आणि तो एकनाथ शिंदे शिवसेना गटाचा आहे याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिलेदारांनी आणि मतदारानी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बोईसर मतदार संघाचे उमेदवार विलास तरे हे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.
हे दोन्ही उमेदवार पक्ष बदलण्यात माहीर असले तरी हे राजकारण आहे. असे असताना देखील पालघर जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या मतदानाचा कौल त्यांचा पसंती उमेदवार राजेंद्र गावित यांना 112894 अशी एकूण मते देऊन विजयी केले आहे. तर त्यांचे विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांना 72557 मते मिळाल्यामुळे ते पराभूत झाले आहेत .
तर विलास तरे हे एकूण 126117 मतांनी विजयी झाले आहेत . त्यांचे विरोधी पक्षाचे बोईसर मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील एकूण (81662) मते मिळवून पराभूत झाले आहेत.
हा विजय राजेंद्र गावित यांच्या पालघर जिल्ह्यातील विकास कामांच्या जोरावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजना याची पोच पावती म्हणून पालघर जिल्ह्यातील मतदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजेंद्र गावित आणि विलास तरे यांच्या विजयी रूपात दिली आहे.
तर वसई नासोपारामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे दोन्ही उमेदवार पराजित झाले आहेत वसई मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्नेहा दुबे पंडित 77553 मताने विजयी झाल्या आहेत त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे.
तर नालासोपारा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे राजन नाईक 164243 अशा बहुमताने विजयी झाले आहेत त्यांनी क्षितिज ठाकुर यांचा पराभव केला आहे.तर डहाणू मतदार संघामध्ये (लाल बावटा ) कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले हे 104702 अशा मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी भाजपचे विनोद मेढा यांचा पराभव केला आहे.