महाराष्ट्र

अभिजित (आबा) पाटील यांना “शिवरत्न” चा आशीर्वाद मिळाला अन् “विठ्ठल” चा चेअरमन माढा चा आमदार झाला…

“जायंट किलर” अभिजित (आबा) पाटील तर “किंग मेकर” ठरले शिवतेजसिंह मोहिते पाटील…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माढा येथील शिंदे बंधूंनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली विधानसभा निवडणुक “तुतारी” वाले अभिजित (आबा) पाटील यांनी जिंकली असुन या संपूर्ण निवडणूकीत “किंग मेकर” ठरले ते अकलूज चे शिवतेजसिंह मोहिते पाटील…

शिंदे कंपनीची जवळ जवळ तीस वर्षांची राजकीय कारकीर्द अभिजित (आबा) पाटील यांनी रणजीतसिंह शिंदे यांचा तीस हजाराच्या वर मतांनी पराभव करत संपुष्टात आणली,हे विशेष…

माढा मध्ये रणजीतसिंह शिंदे यांचा पराभव झाला तर तिकडे करमाळा मध्ये संजय शिंदे यांना नारायण पाटील यांनी नमविले,बार्शी मध्ये दिलीप सोपल विजयी झाले तर माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने उत्तमराव जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव करत जोरदार “तुतारी” फुंकली…

अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच ते माढा विधानसभा मतदार संघाचे “किंग मेकर” असा प्रवास करणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्याचे “कणखर” नेतृत्व असेल…

एवढ्या उमद्या वयात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी राजकारणातील आपली योग्यता ज्या प्रकारे सिद्ध केली आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे आणि भविष्य काळात “अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारखे संयमी “विकासरत्न” नेतृत्व अकलूज च्या भूमीतून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी तत्पर असेल हे हि तितकेच खरे…

महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे येत अनेक युवकांनी महाराष्ट्राच्या जडण घडणीत आपले मोलाचे योगदान दिले…

यशवंतराव चव्हाण,शरदचंद्र पवार,बाळासाहेब ठाकरे,गोपीनाथ मुंडे,विलासराव देशमुख,ए आर अंतुले,विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय कारकीर्द सुध्दा युवा अवस्थेत सुरू झाली होती,हे विशेष…

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हि तरुण वयात अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच पदा पासून सुरु झाली,दरम्यान लोकसभा निवडणुकीचे वारे सबंध देशात वाहत असताना माढा लोकसभेतील माढाच विधानसभा मतदार संघाची जबाबदारी हि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी लीलया पेलून दाखवली…

साहजिकच शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेचे प्रगल्भ दावेदार असताना केवळ शरदचंद्र पवार साहेब,जयंत पाटील साहेब आणि “अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या शब्दा खातर अभिजित (आबा) पाटील यांच्या मागे आपली सर्व युवा कार्यकर्त्यांची शक्ती पणाला लावत “किंगमेकर” ची भुमिका पार पाडली…

सोलापूर जिल्ह्यातील हाय होलटेज ड्रामा म्हणून माढा विधानसभे कडे पाहिले गेले,गेली तीस वर्षे विकास कामाकडे पाठ फिरवलेल्या शिंदे कंपनीची राजकीय वाताहत झाली ती त्यांच्या स्वकर्माने,”गद्दारी” चा शिक्का बसलेल्या शिंदे कंपनी कडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हि बदलला आणि “किंगमेकर” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभेचा कार्यक्रम करेक्टच केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button