सपोर्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सुरू असलेल्या मोफत नर्सिंग कोर्सचा सफाळे परिसरातील युवक- युवतींनी लाभ घ्यावा.. गरिमा अगरवाल यांचे आवाहन
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी येथील सपोर्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये सुरू असलेल्या मोफत नर्सिंग कोर्सेसचा सफाळे परिसरातील युवक – युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन DHL सत्वा कन्सल्टिंगच्या अधिकारी गरिमा अगरवाल यांनी केले आहे .
आगरवाडी येथील सपोर्ट कौशल्य विकास व पुनर्वसन केंद्रामध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांनी बोलताना या भागातील विद्यार्थ्यांना हे आवाहन केले आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश नैनकवाल तर अमित जकातदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मागील सत्रातील एकूण तीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडिकल किट तसेच स्कूल बॅगचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक समीर सुर्वे, निधी फटनाईक, सोनाली जोशी, स्मिता ठोंबरे, प्रणाली किनी, जनार्दन पाटील, कल्पेश पाटील, शफी अहमद, अशोक तिकम, कमलाकर दळवी, हर्षद गुरव, रवी पिले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.