राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर येथे दाखल…..विकास कामामुळे पालघर आर्थिक ग्रोथ सेंटर होणार… शिंदेंची ग्वाही
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
राज्यात कुठूनही कुठे जायचं असेल तर सात तासाच्या वर लागता कामा नयेत. या दृष्टीने आमचे काम सुरू आहे. वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघर व पालघर ते डहाणू हा सागरी एक्सप्रेस वे मार्गाने जोडणार आहोत त्यामुळे मुंबईला जाणे सोपे होणार आहे. नवीन विमानतळा सुद्धा पालघर मध्ये आपण करणार आहोत. आज या नवीन विकास कामांमुळे खऱ्या अर्थाने पालघर एक आर्थिक ग्रोथ सेंटर होणार आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. त्यामुळे विकास होत आहे. विकास करताना कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे दिली. महायुतीचे पालघर विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी ते पालघर येथे आले होते.
पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही वेगाने पालघरचा आर्थिक विकास होणार आहे. महायुतीने काय केले महाविकास आघाडीने काय केले होऊन जाऊ द्या चर्चा दूध का दूध पानी का पानी आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केले रिपोर्ट कार्ड सादर करायला हिम्मत लागते घरी बसून राज्य चालवता येत नाही बाळासाहेब ठाकरे सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात कामासाठी गेला पाहिजे हे घरी बसून राहतात अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
दररोज निंदा नालस्ती टीका करण्यापेक्षा विकासावर बोला विकासाच्या नावाने तुमच्याकडे ठणठण गोपाळ आहे. फक्त राजकारण करणे यांना माहित आहे. हे केले ते केले तुम्ही काय केले ते सांगा फक्त कोमट पाणी प्या काय चाललंय हे पोटाची खळगी भरायला नुसते कोविड-कोविड करून चालत नाही सरकार यायच्या अगोदर सगळं बंद होतं दुकान बंद होती घरदार बंद होती मंदिर बंद होते आमची सरकार आल्यावर कोविड वगैरे काही नाही सगळे सण उत्सव आम्ही साजरे केले लॉकडाऊन मध्ये माणसं मरत होती तुम्ही पैसे खात होतात खिचडी मध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले म्हणूनच तुमच्या बॅगा चेक केल्या जातात आमच्या पण बॅगा रोज चेक करतात पण आम्ही व्हिडिओ काढून तो सगळीकडे प्रसारित करत नाही अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली
लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत आहे लोकशाही त्याचाच विजय होत असतो लोकशाहीमध्ये बहुमताचा विजय होतो बाळासाहेबांचे विचार त्यांनी तोडून मोडून काढले महाराष्ट्रातील जनतेचा तुम्ही विश्वासघात केला शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती ती शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सोडवली असेही त्यांनी यावेळी उबाठा वर टीका करताना सांगितले.
मनमोहन सिंग सरकारने 2004 ते 2014 या दहा वर्षात किती पैसे दिले तर फक्त दोन लाख कोटी रुपये दिले 2014 ते 2019 या दहा वर्षात मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपये दिले यामुळे राज्यात विविध विकास काम करता आली एअरपोर्ट बांधता आले, बंदर, रस्ते , पाणी व इतर प्रकल्पासाठी पैसे सरकारने दिले समविचारी सरकार जेव्हा राज्यात येते तेव्हा राज्याची भरभराट होते असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.