महाराष्ट्र

दि मॉडेल विविधांगी प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी शिवजयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली.

तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित माळीनगर च्या नूतन संचालकांचा सत्कार प्रशालेतर्फे करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपप्राचार्य रितेश पांढरे होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालिका वैशाली पांढरे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक कल्याण कापरे,पतसंस्थेचे नूतन संचालक अनिल सुर्वे, सुहास साठे,अमोल राऊत अक्षय शिवरकर, अभिजीत बनकर, सचिन आतकर, प्रदीप बोरावके,कमलाकर लांडगे,सचिन हजारे, रूपाली नवले,सेक्रेटरी संदीप गदादे उपस्थित होते.
शिक्षक पतसंस्थेचे नूतन संचालक व संचालिका आदी मान्यवरांचा सत्कार प्रशालेतर्फे गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.

प्रशालेच्या विद्यार्थिनी जोया तांबोळी,त्रिशा शिंदे,गौरी बेंद्रे,अक्षरा लोहार,आदिती नागरगोजे,कांचन पराडे,प्रणिती देवकर,तब्बसूम शेख, स्वामिनी थोरात,जानवी दाढे,विद्यार्थी सार्थक चौरे,सुजित पाटोळे,स्वराज्य सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले.तसेच स्वराज्य सावंत यांने विशेष भाषण केल्याबद्दल त्यास शिक्षक जगन्नाथ कोळी यांनी रोख पारितोषिक दिले.सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन मान्यवरांचे हस्ते कौतुक करण्यात आले

“एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर…” या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शिक्षक बाळासाहेब सोनवणे,रघुनाथ वाघमारे,दिलीप हजारे, यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वाघमारे यांनी केले तर आभार संजय बांदल यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button