मला आमदार झाल्यासारखं वाटतंय.मला आमदार करा, राज्यपालांकडे तब्बल 600 अर्ज.

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448
राज्यात राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडलेल्या असताना या जागांकरता तब्बल 600 अर्ज राज्यपाल कार्यालयाकडे आले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात दाखल केलेल्या अर्जातून ही बाब उघड झाली आहे. अमरावती इथले माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी राज्यपाल कार्यालयाकडे याबद्दल माहिती मागितली होती त्यावर राज्यपालांच्या कार्यालयाकडून आमदारकीसाठी 600 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडी धारक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे.
मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्याने या आमदारांची नियुक्ती अद्याप अनिश्चित मानली जात आहे तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप याबाबत कुठलाच निर्णय झालेला नसल्याने अमरावती शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी राज्यपाल कार्यालयाकडे याबाबत माहिती विचारली. त्यामाहिती अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात आमदारांच्या 12 जागांसाठी राज्यभरातून तब्बल 600 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने अर्जदार पखाले यांना दिली आहे. या अर्जांमध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडीधारक यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबाबत निर्णय घेत नव्हते, त्यामुळे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तर महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी रद्द करत शिंदे फडणवीस सरकारने नवी यादी तयार करण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मुदतवाढ मागितल्याने सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे.



