ग्रामपंचायत पुरंदावडे येथील ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गावचे नागरिक त्रस्त उद्यापासून करणार बेमुदत उपोषण – संतोष प्रकाश ओवाळ

माळशिरस प्रतिनिधी महेश मोहिते
माळशिरस ता.मौजे पुरंदावडे गावचे नागरिक कुठल्याही विकास कामाचे बाबतीत विचारणा करावयास गेले असता पुरंदावडे ग्रामसेवक उद्धट भाषा वापरतात समाधानकारक व योग्य उत्तरे देत नाहीत तसेच ग्रामसेवक महिला असल्याने सतत तेथील नागरिकांना केस करण्याची धमकी देतात एका पार्टीची बाजू घेऊन दुसऱ्या पार्टीच्या लोकांची कामे जाणून-बुजून अडविले जात आहेत अशा पद्धतीने त्यांचा मनमानी कारभार चाललेला असून त्यामुळे पुरंदावडे गावचे नागरिक त्रस्त झालेले आहेत

अशा हेकट व मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी व पुरंदावडे ग्रामस्थांना योग्य न्याय मिळावा यासाठी दिनांक २६/१०/२०२३ गुरुवार रोजी ग्रामपंचायत पुरंदावडे कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असे उपोषण करते संतोष प्रकाश ओवाळ व संघर्ष भगवान ओवाळ यांनी टाईम्स 9 मराठी न्युज शी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही दिनांक २०/१०/२०२३ शुक्रवार रोजी या ग्रामसेवकाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे व बेमुदत उपोषणास बसणार याबाबतचा विनंती अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना दिला आहे.

त्याच अनुषंगाने दिनांक २३/१०/२०२३ सोमवार रोजी ग्रामपंचायत पुरंदावडे यांना अर्ज केला की ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणासाठी दिनांक २६/१०/२०२३ वार गुरुवार रोजी मंडप टाकनेस व स्पीकर साठी परवानगी मिळावी या मागणीचा अर्ज केला परंतु त्यांनी गावातील शांतता व सुव्यवस्थेचा कारण दाखवत सदरची परवानगी नाकारली तरी देखील आम्ही बेमुदत उपोषणाला बसणारच “अन्यायाविरुद्ध लढता लढता मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही” असे प्रतिपादन उपोषण कर्ते संतोष प्रकाश ओवाळ व संघर्ष भगवान ओवाळ यांनी केले.



