बावडा दूरक्षेत्र पोलीसांनी परीसरातील शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या ११ विद्यूत मोटारी हस्तगत केल्या.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
इंदापूर पोलीस स्टेशन अंकीत बावडा दूरक्षेत्र पोलीसांनी परीसरातील शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या ११ विद्यूत मोटारी हस्तगत केल्या. तर एका चोराला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली करवून घेतली. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप, पाण्याच्या मोटारी, केबल तसेच शेळया चोरून नेण्याच्या घटनमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनचे गांभीर्य लक्षात घेवून सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांचे टिमला चोरींचे प्रमाण कमी करण्याबाबत सुचना केल्या होत्या.

त्यानूसार सदर चोरीच्या तपासात पोलीसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळताच सागर शिवाजी साठे ( वय २१ वर्षे, काटी ता इंदापूर ) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता गुन्ह्याची कबूली दिली. आरोपीने चोरलेल्या शेतातील ११ विद्यूत पंप पोलीसांनी हस्तगत केलेल्या आहेत. सदर बाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे चार गुन्हे दाखल झालेले आहेत.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक के.बी शिंदे, माने, हवालदार जाधव, सुनिल कदम, जगन्नाथ कळसाईत, गायकवाड, हेगडे, अंमलदार आरीफ सय्यद, अकबर शेख, विक्रम जमादार, विनोंद लोखंडे, नंदु जाधव यांनी केली.



