कोसदनी येथे पोलीस व्हॅनला जबर धडक.पोलिस कर्मचाऱ्यासह दोन जागीच ठार तर दोघे गंभिर जखमी

यवतमाळ प्रतिनिधी मायाताई पाईकराव
काल दिनांक 29 7 2023 रोजी रात्री साडे अकराचे दरम्यान नागपूर तुळजापूर हायवे वर असलेल्या कोसदनी जवळील पुलासमोर आयशर वाहन क्रमांक एम एच १३ सी यु 4982 हे हायवे वर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस व्हॅनला दिसून आले असता त्या विषयी चौकशी करण्यासाठी पोलिस व्हॅन थांबलेल्या आयशर वाहनाच्या पाठीमागे थांबवण्यात आली होती.

आयशर चालक हा पुर्विच वाहानाच्या पाठीमागे उभा होता त्यास वाहान हायवेवर का थांबवले आहे ही चौकशी करण्यासाठी पोलिस कर्मचारी संजय नेटके हे चालका जवळ जाताच पोलिस व्हॅनच्या पाठीमागून येणाऱ्या आयशर क्रमांक यु पी 63 बी टी 9127 च्या वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधा वेगाने व निष्काळजीपणानेे चालवून पोलीस व्हॅनला जबर धडक दिली यात पोलिस व्हॅनही समोरील उभ्या असलेल्या आयशरला धडकली असता दोन्ही वाहनाच्या मध्ये उभे असलेले पोलीस कर्मचारी संजय रंगराव नेटके वय 41 वर्ष आणि आयशर चालक पांडुरंग हरी नकाते वय 50 हे दोघेही दोन्ही वाहनाच्या मध्ये दाबून मृत्यू पावले आहेत. तर संतोष देवराव हराळ व कुणाल बबनराव साळवे असे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यामध्ये उपचार करण्याकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हि जबर धडक येवढी जोराची होती की यात पोलीस व्हॅनही पूर्णतःक्षतीग्रस्त झाली असून पोलीस कर्मचारी सुभाष मोतीलाल नागदिवे वय 41 वर्ष यांच्या फिर्यादीवरून आर्णी पोलीस स्टेशनमध्ये फरार वाहनचालकावर अपराध क्रमांक 428/2023 कलम 427,279,338,304,अ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ए एस आय व्यंकटेश मच्छिवार करीत आहे.




