नहीं रहे “रतन” टाटा…भारताच्या उद्योग क्षेत्रातील “रतन” हरपला…!

⛔ टाटा उद्योग समुह आज खऱ्या अर्थाने पोरका झाला,टाटाचां “रतन” हरपला…!
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा उद्योग समुहाला आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नवी उंची मिळवून देणाऱ्या “रतन टाटा” यांचे काल रात्री मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले,मृत्यू समयी ते 86 वर्षाचे होते…
28 डिसेंबर 1937 रोजी गुजरात च्या सुरत या शहरा मध्ये रतन टाटा यांचा जन्म झाला होता,जमशेदजी टाटा यांच्या तिसऱ्या पिढीतील वारसदार म्हणून सबंध जगाने यांच्या कडे नजरा लावल्या होत्या,अशातच टाटा उद्योग समुहाला एक नवी उंची मिळवून देणारे रतन टाटा यांचे 09/10/ “24 रोजी निधन झाल्याने सबंध”टाटा उद्योग समुह” पोरका झाला…
आयुष्यभर अविवाहित आणि निर्व्यसनी राहत जगण्याचा नवा दृष्टिकोन शिकवणाऱ्या “रतन टाटा” यांनी अनेक माणसे घडवली,कलात्मक आणि नवी ऊर्जा असणाऱ्या युवकांना बरोबर घेत टाटा उद्योग समुहाचे नांव आंतरराष्ट्रीय बाजारात अजरामर करणाऱ्या “रतन टाटा” यांच्या निधनाने अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली…
रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते,ज्यांना जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते,ते टाटा समूहाचे संस्थापक होते.त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली ते १९६१ मध्ये टाटा मध्ये रुजू झाले…

जिथे त्यांनी टाटा स्टीलच्या दुकानात काम केले.नंतर ते जे आर डी टाटा यांच्या निवृत्तीनंतर टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये उत्तराधिकारी बनले.१९९६ मध्ये त्यांनी टाटा टेलि सर्व्हिसेस ही समूहाची दूरसंचार कंपनी सुरू केली होती आणि २००४ मध्ये त्यांनी समूहाची आयटी शाखा असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा IPO सुरू केला होता,२०१२ मध्ये पायउतार झाल्यानंतरही,त्यांनी टाटा सन्स,टाटा मोटर्स,टाटा स्टील आणि टाटा केमिकल्स सह अनेक टाटा कंपन्यांचे मानद अध्यक्षपद भूषवले…
त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली,जग्वार लँड रोव्हर आणि कोरस यांचे अधिग्रहण केले,ज्यामुळे टाटा मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलला.रतन टाटा हे जगातील सर्वात मोठ्या परोपकारी लोकांपैकी एक होते…
त्यांनी त्यांच्या मिळकती तील सुमारे ६०-६५% धर्मादाय संस्थांना दान केले होते.टाटा देखील एक विपुल गुंतवणूकदार होते आणि त्यांनी अनेक स्टार्ट अप्स मध्ये असंख्य गुंतवणूक केली आहे.टाटा यांनी आजपर्यंत ३० हून अधिक स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे…
बहुतेक वैयक्तिक क्षमतेने आणि काही त्यांच्या गुंतवणूक कंपनीद्वारे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहां पैकी एक असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले…
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क अकलूज आणि परिवाराच्या वतीने रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली…



