महाराष्ट्र

वर्वे येथील प्रथमेश रिसॉर्टवर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर तालुक्यातील निगडे – धांगवडी येथील माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २००१ – २००२ च्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी एकत्र आले.

सुमारे २२ वर्षांपूर्वी सन २००१ – २००२ मध्ये निगडे – धांगवडी येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीची परीक्षा देऊन विभक्त झालेले मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सुमारे ३२ विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते. तत्कालीन शिक्षक श्री नवगिरे सर, श्री पाटील सर, श्री पवार सर, श्री तनपुरे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पिसाळ सर यांच्या चांगल्या मार्गदर्शनामुळे ही सर्व मुले आज योग्य मार्गक्रमण करीत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेविषयी किंवा शाळेतील वर्गामधील गमतीजमती, अभ्यास विषयक अनुभव या ठिकाणी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलांनी व मुलींनी खूप परिश्रम घेतले. या सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button