आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूज येथील क्रीडा संकुलाच्या विकासकामाकरीता १५ कोटींचा निधी
प्रतिनिधी /अकलूज ;
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याकरिता १५ कोटीचा निधीच्या अंदाज पत्रकास व अराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच क्रीडा संकुलाचे प्रलंबित कामे सुरू होतील अशी माहीती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
सदर संकुलामध्ये ३० टक्के इनडोअर हॉलचे बांधकाम सुविधा झालेली आहे.सदर संकुलाचे रु.१४१४.६५ लक्ष अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यामध्ये बॅडमिंटन हॉल, उर्वरित बांधकाम बॅडमिंटन कोर्ट प्रेक्षक गॅलरी, प्रोप्लेक्स शीट छत, रंगरंगोटी, पथदिवे, विद्युतीकरण, पाणी पुरवठा, व संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, रेन वॉटर हावेस्टींग, फर्निचर, पार्कीग, सी.सी. ड्रेन, व इतर कामे होणार आहेत .प्रस्तावित कामांपैकी बॅडमिंटन हॉलचे उर्वरित बांधकाम ४ बॅडमिंटन कोर्ट व प्रेक्षक गॅलरी, प्रोप्लेक्स शीट छत, रंगरंगोटी, ही कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात येणार आहे.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल एक अद्ययावत क्रीडा संकुल होणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना यांचा फायदा होणार आहे.
जनसंपर्क विभाग