द ग्रेट टीम इंडिया…आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकत भारतीय संघ बनला विश्वविजेता…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
चोकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ…
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली.त्याला अक्षर पटेल,शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली.भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका समोर ठेवलेले १७७ धावांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असे वाटत होते परंतु रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या,जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघाने एक नेत्रदीपक विजय मिळवत आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2024 ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.भारतीय क्रिकेट संंघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन…
चक दे इंडिया…
अन् विराट कोहली ने T20 क्रिकेट मधुन जाहीर केली निवृत्ती…
हि वेळ नव्हतीच…
तसे पाहिले तर क्रिकेट हा खेळ च धक्का तंत्राचा आहे परंतु विराट भाईंनी घेतलेली निवृत्त्ती मनाला चटका लावणारी आहे,यश अपयश पचवत इथ पर्यंत आलेला विराट मॅच विनर हि ठरला होता “लेकीन” त्याने घेतलेला निर्णय कुणालाच पटला नसेल…
जाता जाता विराट ने येणाऱ्या नव्या पिढी साठी संधी देण्याची भुमिका थोडी फार घाई केल्या सारखीच…
विराट मध्ये आणखी भरपूर क्रिकेट शिल्लक आहे त्याने घेतलेल्या निर्णयाशी तो सहमत असेलच असे नाही,माझ्या सारख्या काहींना त्याचा हा निर्णय आवडला नाही,त्याने T20 मधुन जाहिर केलेली निवृत्ती सबंध क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का आहे…
नावा प्रमाणेच “विराट” अशी क्रिकेट इनिंग खेळणाऱ्या कोहलीला टाइम्स 9 न्यूज समुहा कडून शुभेच्छा…