शहर

करमाळा एसटी आगार म्हणजे ओंगळ नमुन्याचा भोंगळ कारभार,,,, करमाळा एसटी बसने नको रे बाबा प्रवास, खाजगी वाहनाचा प्रवास बरा.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या करमाळा एसटी आगाराचा कारभार म्हणजे ओंगळ नमुन्याचा भोंगळ कारभार सध्या झाला आहे सदर एसटी आगाराच्या दुर्लक्षितपणा बाबत बोलावे तसेच लिहावे तेवढे कमीच आहे

यामध्ये वेळोवेळी बंद पडणाऱ्या एसटी गाड्या, प्रत्येक एसटी गाड्याला नाम फलक नसणे, मोकाट जनावराचा हैदोस, चोरांचा वाढते साम्राज्य, खाजगी वाहनाचा एसटी बस मध्ये अड्डा, घाणीचे वाढते साम्राज्य, महिला शौचालयाची दुरवस्था, वाहतूक नियंत्रकाचा दुर्लक्षितपणा, चालक वाहकाचे अरेरावेपणा, आगारातील सीसीटीव्ही सदैव बंद, आगारातील एसटी बसेस प्लॅटफॉर्म सोडून कोठेही व कशाही पद्धतीने लावणे, चौकशीसाठी नेमलेला कर्मचारी गैरहजर असणे, रोड रोमिओ चा आगारामध्ये वाढता हैदोस, लांब मार्गाच्या गाड्या मध्येच बंद पडणे, नियमित मार्गावर असणाऱ्या बसेस कधीही बंद व चालू करणे, वाढत्या चोऱ्यांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता अशा पद्धतीने एक ना अनेक समस्याच्या विळख्यात सध्या करमाळा एसटी आगार सापडले आहे

सध्या करमाळा तालुक्यातील प्रवासी करमाळा एसटी आगाराच्या बसने प्रवास नको रे बाबा,, एक वेळ खाजगी वाहने परवडली असे प्रवासी वर्ग खाजगी मध्ये बोलताना म्हणत आहे याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे मात्र याकडे आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे सदरच्या एसटी आगाराला कोणीही वाली राहिला नसून सदरच्या आगाराने जणू काही फक्त प्रवाशांना त्रास देण्याचे कार्य सध्या चालू केलेले दिसत आहे करमाळा आगारातील सर्व एसटी बसेस गेली पाच ते सहा महिन्यापासून करमाळा तालुका तसेच पर जिल्ह्यात प्रत्येक मार्गावर बंद पडलेल्या अवस्थेत दिसत आहे याचा मनस्वी त्रास प्रवाशांना होत आहे बंद पडलेल्या एसटी बसेस चे रोजच्या रोज सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असून याचे आगार व्यवस्थापकाला काहीही देणे घेणे नाही आगार व्यवस्थापक फक्त झोपेचे सोंग घेत असून प्रवाशांच्या सेवेसाठी कोणतेही ठोस पावले सध्या आगार व्यवस्थापक उचलत नाही अशा या गेंड्याची कातडी पांघरलेल्या आगार व्यवस्थापकाला जाग केव्हा येणार असा संतप्त सवाल प्रवासी वर्गामधून उपस्थित होत आहे

करमाळा एसटी आगारात मोकाट जनावराचा हैदोस तर ही नित्याचीच बाब झाली आहे अनेक जनावरे जणू काही आम्हाला गावाला जावयाचे असल्यासारखे बिन दिक्कतपणे प्रवाशाच्या रांगेत उभे असतात याशिवाय अनेक जनावरे बस स्थानकात मोकाटपणे फिरत असतात याशिवाय एसटी आगारातील प्रत्येक बसेसच्या खिडक्या तसेच बसमधील बैठू व्यवस्था अक्षरशा तुटलेल्या असून काही बसेस गळक्या स्वरूपाच्या आहेत याशिवाय अनेक बसेस तालुक्याच्या मार्गावर तसेच परत जिल्ह्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी बंद पडलेल्या असतात याबाबत प्रवाशांनी आगार व्यवस्थापकाला विचारणा केली असती मगर घट्ट तसेच गेंड्याची कातडी पांगरलेल्या आगार व्यवस्थापकाचा फोन मात्र चक्क बंद असतो अशा या प्रवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या आगार व्यवस्थापकाची आता हाकालपट्टी करण्याची वेळ प्रवासी वर्गावर येऊन ठेपली आहे

बंद पडलेल्या एसटी बाबत तसेच नवीन बसेस करमाळा आगाराला मिळाव्या यासाठी करमाळा शहरातील काही पत्रकार तसेच सामाजिक संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न केले मात्र शासनाने देखील कागदोपत्री घोडे नाचविण्याचे काम केले आहे याचाच अर्थ सध्या करमाळा एसटी आगाराला गलथान व भोंगळ्या कारभाराबाबत कोणीही खमक्या व दमदार नेता नाही सर्व काही चिडी चूप आहे याचा सर्वस्वी त्रास सध्या प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणात होत आहे बंद पडलेल्या एसटी बाबत आगार व्यवस्थापक मात्र प्रवाशांना सेवा देण्याचे मात्र लांबच मात्र उलट पणे आगारा मधील कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा दुटप्पीपणा सध्या आगार व्यवस्थापक करीत आहे अशा या आगार व्यवस्थापकाची करमाळा येथून हकालपट्टी करावी किंवा प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य मिळवणाऱ्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच करमाळा आगाराच्या नियमित होणाऱ्या दुर्लक्षितपणाकडे लक्ष द्यावे अन्यथा प्रवासी वर्गाचा संताप कधी उसळेल हे सांगता येत नाही

एकंदर पाहता सध्या करमाळा एसटी आगाराला कोणीही वाली नसल्याने प्रवासी वर्ग मधून बोलले जात आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने वेळीच लक्ष देऊन संबंधित आगार व्यवस्थापकाला समज द्यावी व प्रवाशांना वेळोवेळी होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी करमाळा तालुका प्रवासी संघटने मधून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button