एकनाथ शिंदे बरोबर गेलेले आमदार पिता-पुत्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला! पक्षात घेण्यास स्पष्ट नकार!!
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासबोतच्या 40 आमदारांची साथ सोडली होती. त्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. यानंतर न्यायलयातील घडामोडींनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आणखी काही आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते. यामध्ये माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांच्या पुत्र आमदार विप्लव बजोरीया यांचाही समावेश होता.
दरम्यान साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांच्या पुत्र आमदार विप्लव बजोरीया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होती. परंतु, ठाकरे यांनी बजोरीया यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिला.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. महविकास आघाडीच्या माध्यमातून लधत असताना त्यांनी 40 आमदार 13 खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा 9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे राज्यात अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निकालामुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा सतत ऐकू येत असते. राज्यात पुढील तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.