क्रीडा

सदाशिवराव माने विद्यालय अकलूज प्रशालेत “जागतिक योग दिन” मोठ्या उत्साहात साजरा

अकलूज प्रतिनिधी कादर शेख टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

सदाशिवराव माने विद्यालय प्रशालेत आज “जागतिक योग दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री.मुलाणी सर व श्री.बनपट्टे सर यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.याप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे सादरीकरण केले.

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षिका, शिक्षक,शिक्षतेकर कर्मचाऱ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक केले.तसेच प्रशालेत आज “जागतिक संगीत दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थीनी कु.स्वरा दिनकर गायकवाड हिने “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” हे बालगीत सादर केले.सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला प्रोत्साहन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button