1 जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायदेविषयक माहिती व मार्गदर्शन करताना केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
केंद्र सरकारने 1 जुलै 2024 रोजी पासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनंतर सध्या लागू असलेल्या ब्रिटिश कालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि 1872 चा भारतीय पुरावा कायदा नियोजित तारखेपासून काल बाह्य होईल या अनुषंगाने या नवीन कायद्यांची सविस्तर माहिती पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना देण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी नवीन कायद्यांची माहिती याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य,तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, ग्राम रक्षक दलाचे सदस्य तसेच विविध पक्षाचे कार्यकारी कार्यकर्ते पदाधिकारी व या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.