महाराष्ट्र

बँक फसवणूक प्रकरणी मुंबईत ईडीचे 12 ठिकाणी छापे

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

बँक ऑफ बडोदाची 975 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक गुन्ह्यात मे. मंधाना इंडस्ट्रीज व इतरांशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने 12 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एक कोटींची रोख व मालमत्तेशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले.                             

मंधाना इंडस्ट्रीजचे संचालक व इतरांनी बँक ऑफ बडोदाकडून कंपनीच्या विस्तारासाठी 975 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, बँकेच्या कर्जाचे हप्ते चुकते केले नव्हते. बँकेने चौकशी केली असता, कर्जाचा पैसा संचालकांनी स्वत:च्या खात्यात वळता करून त्यातून मालमत्ता व शेअर्स खरेदी केल्याचे आढळून आले. त्यानंतर याप्रकरणी मंधाना इंडस्ट्रीजचे संचालक पुरुषोत्तम मंधाना, मनीष मंधाना, बिहारीलाल मंधाना आणि इतरांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात् सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी या प्रकरणी चौकशी करीत आहे.

शुक्रवारी कंपनीच्या संचालकांच्या 12 ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यानंतर एक कोटींची रोख व मालमत्तांचे दस्तऐवज तसेच वाहने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. याशिवाय पाच कोटी रुपयांचे शेअर्स, बँक खाती आणि लॉकर्स गोठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button