सोलापूर जिल्ह्यातील मोहोळकरांची “शान” असलेला “सिकंदर शेख” यंदाचा महाराष्ट्र केसरी…
आमीर मोहोळकर
प्रतीनीधी,टाईम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
घरचं अठरा विश्व दारिद्य्र,त्यात कुस्तीचा नाद जडला,अल्पावधीतच तमाम कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आणि दिल्ली,पंजाब,हरयाणा येथील नामांकित पैलवानांना आपल्या बुद्धी व ताकतीचा अंदाज दाखवत कुस्तीच्या क्षेत्रातील नामांकित मल्ल ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील एका हमालाचा पोरगा असलेल्या “सिकंदर” शेख ने यंदाचा “महाराष्ट्र केसरी” किताब पटकावला…
पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेत अखेर ची लढत गत विजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यात झाली,अवघ्या 20 सेकांदामध्ये “झोळी” या डावावर शिवराज राक्षे याला चितपट करत सिकंदर शेख ने महाराष्ट्र केसरी ची मानाच्या गदे सह “थार” हि चार चाकी वाहन आणि रोख पारितोषिक पटकावले…
विशेष म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर चा पराभव झाला होता,त्या वेळी बोलताना सिकंदर ने पुढच्या वर्षी आपण नक्की जिंकून दाखवू असा विश्वास व्यक्त केला होता,अखेर स्वतःच्या शब्दाला जागत आणि तमाम कुस्ती शौकिनांच्या आशीर्वादाने हे यश मिळवत सोलापूर जिल्ह्याची आण बाण आणि शान राखली…
“सिकंदर शेख” च्या या यशाने मोहोळ सह सोलापूर जिल्ह्यात एकच जल्लोष करण्यात आला,तमाम कुस्ती शौकिनांनी एकमेकांना आलिंगन देत हा विजय साजरा केला.
कुस्ती ची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर येथील गंगा वेस तालमीत सराव करत “सिकंदर” शेख ने सोलापूर जिल्ह्यासह मोहोळकरांची शान वाढवली हे मात्र तितकेच खरे…