क्रीडा
शिवराज राक्षेला चीतपट करत सिकंंदर शेखने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा
सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007 93 2121
महाराष्ट्र केसरी 2023 : अखेर चपळ चिता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे.
शिवराज राक्षेला चीतपट करत सिकंंदर शेखने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा
सांगली : महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला दहा सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने आस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला