महाराष्ट्र

अखेर एस. टी. आंदोलनाला आले यश

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007 93 2121

सांगली: दि.9 महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या बेमुदत आमरण उपोषणावर विविध मागण्यांसंदर्भात मा. आ. गोपीचंदजी पडळकर आणि मा. आ. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी परिवहन सचिव श्री. जैन, रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्नेसो तसेच शिष्टमंडळामध्ये संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी, प्रकाश कांबळे, बापू हराळे, आशिष बाळासराफ, अनुप खैरनार, सौ. पद्मश्री राजे इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

या बैठकीत खालील निर्णय करण्यात आले :-

१) एसटी कर्मचारी व अधिकारी त्यांना सरसकट ६०००/-(सहा हजार रुपये) सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर.

२) खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी २४० दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती.

३) सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी शासन बैठक घेऊन निर्णय घेणार.

४) कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका, जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करून एस टी कर्मचाऱ्यांची रुग्णालयाची बिले महामंडळ देय करणार.

५) घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल.

६) एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी रुपये ९००/- कोटी रुपये देण्यात आले.

७) शिस्त आवेदन पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक केली असून ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेणार.

८) रा. प. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एका महिन्यात रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडे देण्यात येणार.

९) अनुकंपा तत्त्वावरील व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत ३० दिवसांचे विशेष अभियान राबवून नियुक्ती देणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button