कर्नाटकचे उद्योग मंत्री यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभास डॉ. धवलसिंह मोहीते- पाटील व उर्वशीराजे मोहीते- पाटील यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उद्योग व पायाभूत सुविधा विकास मंत्री ना एम बी पाटील यांचे चिरंजीव बसनगौडा पाटील व चि सौ का अखिला यांचा विवाह 29 नोव्हेंबर 2023 रोजी बेंगलोर येथे संपन्न झाला होता या विवाह प्रित्यर्थ नामदार एम बी पाटील यांनी विजापूर येथील बी एल डी ई इन्स्टिट्यूट येथे नवदांपत्याचा स्वागत समारंभ आयोजित केला होता या स्वागत समारंभास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहीते पाटील व शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेच्या चेअरमन उर्वशीराजे मोहीते पाटील यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.
संपूर्ण देशभरातून नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे तसेच काँग्रेसचे मान्यवर नेते गण उपस्थित होते सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहीते पाटील व कर्नाटकचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री ना एम बी पाटील यांच्यातील स्नेहबंध व मैत्री अतूट आहे उद्योग मंत्री ना. एम बी पाटील यांनी डॉ. धवलसिंह मोहीते पाटील यांच्या परिवारास या स्वागत समारंभास उपस्थित राहण्यासाठी आवर्जून अकलूज येथे निमंत्रण दिले होते यानुसार डॉ धवलसिंह मोहीते पाटील व उर्वशीराजे धवलसिंह मोहीते पाटील यांनी या विवाह स्वागत समारंभास आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल व रुक्मिणी यांची मूर्ती नवदांपत्यास भेट दिली .
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहीते पाटील यांच्या समवेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगी, प्रदेश काँग्रेसचे ओबीसी उपाध्यक्ष सुधीर लांडे, काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मल्लेश बिडवे सर, धर्मराज पुजारी, मोतीराम चव्हाण अमोल माने ,अमर काळे पाटील ,विकास शिंदे ,फिरोज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .