पालघर जिल्ह्यातील सफाळे माकुणसार येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
6 वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळे माकुणसार येथे संपन्न झाली.या मॅरेथॉनमध्ये पालघर तालुक्यासह वसई, डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा,नगर,नाशिक ,सातारा,कोल्हापूर, मुंबई इत्यादी ठिकाणावरून 1500 स्पर्धक सहभागी झाले होते.
मॅरेथॉनच्या पारितोषिक समारंभास आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा श्रीमती भारती कामडी,सरपंच श्रीमती .पल्लवी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य व शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष पी टी पाटील सर,टीडीसी बॅक संचालक नागेश पाटील,रणजीपटटू राजेश सुतार ,पालघर जिल्हा क्रिडाअधिकारी सुहास वनमाने , जे एस डब्लू कंपनीचे राजेश भाईर व अनिकेत बामणे ,अखिल भारतीय शिष्य सांप्रदायाचे अध्यक्ष कमळाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते नागेश वर्तक उपस्थित होते.
आमदार राजेश पाटील यांनी ग्रामीण भागात मॅरेथॉन स्पर्धा घेतल्याने ग्रामीण भागांतील खेळाडूंना आपल्यातील कौशल्य, चमक दाखविण्याची संधी मिळते.तसेच या स्पर्धांमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यात मदत मिळते.मॅरेथॉनची व्याप्ती वाढविण्याबाबत प्रतिपादन आमदारांनी केले तर जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास वनमाने यांनी खेळाडूंमधील उत्साह व आयोजकांची तयारी याबाबत कौतुक केले.
ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा ॲथलेटिक्स आशिष पाटील व सहकारी यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. मॅरेथॉनच्या तांत्रिक व डिजिटलबाबी लक्ष्मीकांत पाटील व भद्रेश म्हात्रे यांनी सांभाळल्या.
माकुणसार स्पोर्ट फाऊंडेशनचे चिटणीस रूपेश पाटील ,खजिनदार योगेश म्हात्रे व कार्यकारिणी तसेच अनेक स्वयंसेवक,पायलट यांनी मदत केली.
पारितोषिक वितरण सोहळयाचे प्रास्ताविक माकुणसार स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष ठाकुर यांनी केले.तर सूत्रसंचालन राजेश वैद्य यांनी केले.या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची यादी पुढीलप्रमाणे
11 किमी पुरुष अंतिम निकाल
प्रथम- पाटील उत्तम संभाजी – कोल्हापूर
द्वितीय…. मोरे विवेक नारायण – चंदगड कोल्हापूर
तृतीय….चव्हाण बबलू – चाळीसगाव जळगाव
11 किमी महिला..अंतिम निकाल
प्रथम…पटेल अमृता – कांदिवली
द्वितीय..जाधव अर्चना लक्ष्मण – वसई
तृतीय….पिंगले दिव्या दिनेश – सायवान
6 किमी पुरुष..अंतिम निकाल
प्रथम…झोरे सुरेश रामचंद्र – डोंबिवली
द्वितीय…बागुल निवृत्ती – नाशिक
तृतीय….नलवडे रोहित उत्तम – कोल्हापूर
6 किमी महिला..अंतिम निकाल
प्रथम..पाटील अदिती संदीप – सायवान
द्वितीय..सिंग मोनिका संजय – कांदिवली
तृतीय..पवार साक्षी सुभाष – चिपळूण रत्नागिरी
3 किमी मुले
प्रथम- तुंबाडा अजित नाना, माऊली स्पोर्ट्स, विक्रमगड
द्वितीय- किणी रुद्र गणेश, पालघर
तृतीय.- सांगले सुशांत श्रीमंत, पालघर,
3 किमी. मुली
प्रथम – मोरे शर्वी, पालघर
दवितीय – कोडे मनस्वी मिथुन, विक्रमगड
तृतीय चव्हाण दृष्टी दीपक, नालासोपारा
1 किमी 50 वरील
पुरुष( गाव मर्यादित)_
प्रथम.नितीन म्हात्रे
द्वितीय चंद्रकांत पाटील
तृतीय. उमाकांत पाटील
1 किमी महिला 50 वरील(गाव मर्यादित)
प्रथम सरला ठाकूर
द्वितीय रंजना पाटील