डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले वाढवण बंदर बॅनर हटविण्याची मागणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
डहाणू रोड रेल्वे स्थानकावर वाढवण बंदर समर्थनाचे अनधिकृत बॅनरबाजी करून स्थानिक भूमिपुत्र , शेतकरी, कामगार, मच्छिमार, डायमेकर यांच्या भावना दुखावल्याने स्थानिक भुमिपूत्र आक्रमक झाले असून रविवारी 26 नोव्हेंबर 2023 रोजी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने डहाणू रोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना लेखी निवेदन देऊन जेएनपीए कडून सुरू असलेल्या अनधिकृत बॅनरबाजी काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाढवण बंदर संघर्ष समिती कडून डहाणू रोड रेल्वे स्थानकात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रस्तावित वाढवण बंदराचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना आपल्या डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित वाढवण बंदर समर्थनाचे बॅनर अनधिकृतपणे लावण्यात आले असून या बाबत संपूर्ण डहाणू तालुक्यात आणि संपूर्ण किनारपट्टीवरील लोकामध्ये वाढवण बंदर विरोधी असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
असे असताना ही अनधिकृतपणे बॅनरबाजी होत असल्याने स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, बागायतदार, कामगार, मच्छिमार, डायमेकर्स आदी यांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी सदरचे बॅनर त्वरीत काढून टाकण्यात यावेत. बॅनर न काढले गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या संबंधित सक्षम अधिकारी व पोलिस यंत्रणा जबाबदार धरण्यात येईल असा ईशारा देखील सदर निवेदनात दिला गेला आहे.