पालघर व बोईसर येथे भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
बोईसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व पालघर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र करणकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नेत्यांसह उपनेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संविधानाची माहिती देणारा परिचय पट सादर करण्यात आला. संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती यावेळी देण्यात आली.

यादरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना आदरांजली पालघर पोलीस स्टेशन येथे अर्पण करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नरेन्द्र करणकाळे यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना केली आणि त्यावर आपला मोलाचा वाटा उचलला.

या संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. आपण सर्वांनी संविधानाचे पालन केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण करायला हवे.तसेच सामाजिक कार्यकर्ते नविन त्रिपाठी यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे आहेत. संविधानाच्या आधारे आपला देश चालतो. आपण सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नासीर अंसारी, जब्बार सोलंकी, अमोल काळे, बिरबल कुशवाह, महेंद्र कांबळे यांनी महत्त्वाचे भूमिका पार पाडली.



