महाराष्ट्र

जव्हार तालुक्यात विडव्यांवर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत. भ्रमणध्वनी

क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यात किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे . या अवकाळी पावसामुळे शेतकरी गवत पावळीचे व्यापारी आणि विट उत्पादक चिंताग्रस्त झाले असून ग्रामीण भागात काही प्रमाणात नुकसान झाले आहे.भारतीय हवामान विभागाने 26 आणि 27 नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पहाटे पासून विजेच्या गडगडाटासह जव्हार तालुक्यात रिमझिम पावसाचा शिडकाव्याला सुरुवात झाली आहे.

ढगाळ वातावरणासोबत सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी गवत पावळीचे व्यापारी आणि वीट उत्पादक धास्तावले आहेत. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांची भाताची झोडणी अजून बाकी आहेत . पहाटे आलेल्या अचानक पावसाने शेताच्या खळ्यावर रचून ठेवलेली भाताची उडवी भिजली असून त्यावर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे . गवत पावळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गावोगावी वखारी सुरू केल्या असून या अवकाळी पावसाने त्यांचे देखील नुकसान झाले आहे.काही वीट उत्पादकांनी नुकतेच कच्च्या विटा बनविण्यास सुरवात केली असून त्यांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button