खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश: दादर-भुसावळ खांदेश एक्सप्रेसला बोईसर आणि डहाणू रोड येथे थांबा मंजूर.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक- :7030516640
प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-भुसावळ खांदेश एक्सप्रेसला (गाडी क्र. १९००३/१९००४) बोईसर आणि डहाणू रोड रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
तसेच, या गाडीच्या फेऱ्या आता आठवड्यातून ३ दिवसांवरून वाढवून ६ दिवस करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका अधिकृत पत्राद्वारे (पत्र क्र. 2026/Chg/16/WR/52) खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना या निर्णयाची माहिती दिली आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी ७ मार्च २०२६ आणि १६ एप्रिल २०२६ रोजी पत्र पाठवून डहाणू रोड आणि बोईसर रेल्वे स्थानकांवर जनसुविधेसाठी गाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती या पत्रांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने गाडी क्र. १९००३/१९००४ दादर पश्चिम – भुसावळ खांदेश एक्सप्रेसला बोईसर आणि डहाणू रोड स्थानकांवर अधिकृत थांबा मंजूर केला आहे यासोबतच, या गाडीचे परिचालन आठवड्यातून ३ दिवसांवरून ६ दिवस करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनसुविधेमध्ये मोठी भर पडणार असून, बोईसर आणि डहाणू परिसरातील नागरिकांचा व प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे.



