महाराष्ट्र

केतुर येथील मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला दाखवली अक्षरशा केराची टोपली

करमाळा प्रतिनिधी

केतुर तालुका करमाळा येथील मंडळ अधिकारी यांनी चक्क तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे एका जबाबदार तहसीलदार अधिकाऱ्याच्या आदेशाला मंडळ अधिकारी यांनी धुडकावले असल्याने महसूल प्रशासनात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेयाबाबतची सविस्तर माहिती अशी की राजुरी येथील सुधीर भागवत गायकवाड सध्या राहणार जेऊर यांनी त्यांच्या मौजे राजुरी तालुका करमाळा येथील गट नंबर 189 मधील खरेदी खताप्रमाणे सातबारा पत्रकातील नावे कमी होणे बाबत कलम 155 नुसार दुरुस्ती होणे बाबत मंडल अधिकारी यांच्याकडे 10 ऑगस्ट 2023 अर्ज दिला होता मात्र त्यावर मंडलाधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही या उपरोक्त माननीय तहसीलदार यांनी देखील मंडलाधिकारी सुधीर भागवत गायकवाड राहणार जेऊर तालुका करमाळा यांनी मोजे राजुरी तालुका करमाळा येथील गट नंबर १८९ पै. मधील खरेदी खताप्रमाणे सातबारा पत्रकातील नावे कमी होणे बाबत कलम 155 नुसार दुरुस्ती होणे बाबत या कार्यालयास सादर करणेबाबत तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांना विनंती केली होती तसेच प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमत 1966 नुसार चौकशी करून सर्व संबंधित जाचे जाब जबाब घेऊन गटातील क्षेत्राचा मेळ घालून पूरक कागदपत्राच्या प्रमाणित प्रतीसह आपले स्वयं स्पष्ट अभिप्राव अहवाल या कार्यालयास सादर करावे अशी लेखी पत्र माननीय तहसीलदार साहेब यांनी मंडलाधिकारी केत्तूर यांना दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी पारित केले होते मात्र आज तब्बल दोन ते तीन महिन्याचा कालावधी संपला तरी केतुर येथील मंडलाधिकारी यांच्या मनमानी व भोंगळ्या कारभारामुळे अद्यापही सातबारा उताऱ्यावरील नावे अद्यापही कमी झाली नाहीत तहसीलदार यांनी खरेदी खताप्रमाणे सातबारा पत्रकातील नावे कमी होणे बाबत आदेश दिला होता मात्र आदेश देऊन देखील केतुर येथील मंडलाधिकारी यांनी चक्क तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहेतेव्हा मंडलाधिकारी यांनी त्वरित सातबारा वरील नावे कमी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी राजुरी येथील सुधीर गायकवाड यांनी केली आहे मंडळ अधिकारी यांनी आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही येत्या २६ जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिना दिवशी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणास बसू असा इशारा श्री गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button