निवडणूक आयोग बोगस असून आमचा त्यावरचा विश्वास उडाला आहे- तो चुनाव आयोग नसून -चुना लावणारा आयोग आहे— उद्धव ठाकरे

उपसंपादक ——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
आता एकच आशा.. उद्धव ठाकरेंनी अखेर सांगून टाकलं; काय होणार शिवसेना पक्षाचं?_
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर आज उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला यावेळी निवडणूक आयोगावरुन आमचा विश्वास उडाला असून सुप्रीम कोर्ट ही शेवटची आशा असल्याचे ठाकरे म्हणाले. मराठी भाषा दिनाच्या आणि स्थानीय लोकाधिकार समिती संघटनेच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावे होणाऱ्या घोषणेवरही दावा करतील
मातृभाषा. आई फक्त भाषा शिकवत नाही. संस्कारही शिकवले जातात. बाकी काही चोरलं जाऊ शकतं संस्कार चोरले जाऊ शकत नाही. ज्यांच्यावर संस्कार नाहीत ते चोऱ्या करतात. अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटात हातावर लिहिलं होतं. यांनी स्वतःच्या हातानंच कोरलंय. कितीही झालं तरी ठाकरे कसे चोरणार?
शिवसेनेची स्थापना ज्या हेतूनं झाली त्याचा मला अभिमान आहे. मराठी माणसाची अवहेलना केली जात होती. आपल्या राज्यात मराठी माणूस हचबल झाला होता. त्यांना शिवसेना नावाची तलवार बाळासाहेबांनी दिली. न्याय हक्क काय आणि तो लढून कसा मिळवायचा हे या पिढीला माहितीय. आत्ताचे हे पावटे तेव्हा नव्हते. बाळासाहेबांचे विचार कुणासमोर गुडघे टेकणं नव्हते.
ज्या घरात शिवसेनेची स्थापना झाली तिथं मी होतो. नाव ठरण्यापासून आतापर्यंतचा काळ मी पाहिलाय.. आणीबाणीसुद्धा पाहिली, शिवसेनेनं जबर पाठिंबा दिला पण नंतर जे घडलं त्याला पाठिंबा नव्हता, मार्मिकवरसुद्धा बंदी होती. दिवाकर रावते गठ्ठेच्या गठ्ठे हातगाडीवर वाटण्यासाठी जायचे, त्यामुळं ही मुळं घट्ट आहेत. फुलं तोडली की झाड मरत नाही. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणासावरील अन्यायाविरोधात शिवसेना उभी आहे. आई वडिलांचे संस्कार झाले नाहीत की चोरी करायची वेळ येते. ज्या ज्या वेळेला धनुष्यबाण धरतील तेव्हा त्यांच्या कपाळावर चोर हे सुद्धा कोरलं जाईल. हिंमत असेल तर धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन उतरतो.

धगधगते विचार आहे शिवसेना. फक्त चिन्ह म्हणजे शिवसेना नाही. मॉगेंबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी काही बदलणार नाही. एकमेकांत लढवत राहायचं हेच या देशात सुरूय, हे आपलं हिंदुत्त्व नाही आणि मराठीपणही असं नाही. खंडोजी खोपडे आणि कान्होजी नाईकांच्या किती औलाद जन्माला आलीत हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय. भगव्यानं जर आत्मचरित्र लिहिलं तर त्यालासुद्धा किती दुर्दैवातून जावं लागलंय ते तो लिहिल. तरीसुद्धा अजून तसाच फडकतोय. दूध का दूध पानी का पानी नाही तुमचं गोमुत्रही दाखवणार. आज अधिवेशनात मी गेलो नाही. पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी हिंदीत भाषण दिलं. तेही मराठी भाषा दिनी.निवडणूक आयोग बोगसच आहे. आमचा विश्वास उडालेला आहे, चुनाव आयोग नाही चुना लावणारा आयोग आहे. असं पूर्वी कधी घडलं नव्हतं, रामविलास पासवानच्या पक्षातही झालं. वाद सुरू होता. दोघांना आज चिन्ह दिलंय आणि ते शांत झालेत का? दोघे भाजपच्या पाठिंब्यात आहेत. 2024 ची निवडणूक कादिचात देशाची शेवटची निवडणूक असेल. कपिल सिब्बल म्हणाले, मी जिंकेन किंवा हरेन पण मी त्यासाठी उभा नाही, लोकशाही वाचवण्यासाठी उभा आहे.
सुप्रीम कोर्ट शेवटची आशा : ठाकरे
आजपर्यंतच्या न्यायमूर्तींनी प्रतिमा सांभाळली निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात फरक आहे. आता तीच शेवटची आशा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात कुठेही हिस्सा नव्हता ते लोक आता स्वातंत्र्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे नाव वगळून शिवसेना चालवून दाखवा, स्वतःच्या वडिलांचं नाव वगळून लोकांसमोर या. त्यांच्या वडिलांनाही वेदना होत असतील. दुसऱ्याचा बाप हवाय मग मी काय करू? अशी टीकाही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.



