संपादकीय

प्रा.डॉ.चांगदेव कांबळे सोलापूर लोकसभेचे दावेदार…

अकलूज प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी या निवडणुका लाढविनार असून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सर्वच क्षेत्रात केलेली नेत्रदीपक कामगिरी मतदाराला भुरळ पाडणारी आहे. या पार्श्भूमीवर ४२,सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचीत जातीसाठी आरक्षित आहे.या मतदार संघात अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर,सोलापूर शहर मध्य,मोहोळ,पंढरपूर – मंगळवेढा या तालुक्यांचा समावेश आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत.

त्यामध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष बापू देशमुख, आ.समाधान आवताडे,माजी आ.प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आ.यशवंत माने हे हक्काचे आमदार आहेत.२०१४ व २०१९ पासून सोलापूर लोकसभेचे खासदार भाजपचे राहिलेले आहेत.त्यांनी माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे.म्हणून हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. गेल्या २०१९चे निवडणुकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मते घेतली होती.यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना मंगळवेढा,पंढरपूर,मोहळ या तालुकयांमध्ये लीड मिळाले होते.

सध्याचे खासदार डॉ.जयसिद्धेश्र्वर महस्वामी यांच्या जातीच्या दाखल्याचे प्रकरण कोर्टात आहे. त्यांच्यविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे.या चाळीस बेचाळीस वर्षे भाजपाचे निष्ठावान व संघाचे मुशीतून तयार झालेले आणि १९९६ व १९९८ ला पंढरपूर राखीव लोकसभा मतदार संघातून कमळ चिन्हावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवून त्याकाळी सव्वा दोन लाखापर्यंत मते मिळवलेले आनुभवी असणारे .प्रा.डॉ. चांगदेव कांबळे हे रयत शिक्षण संस्थेत ३६वर्षे सिनियर कॉलेजला मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

ज्या काळात भाजपला उमेदवार मिळत नव्हता त्या काळात सहकाराचे प्राबल्य आसणाऱ्याशिवाय प्रा.डॉ.कांबळे हे गेली वीस वर्षे पंढरपूर येथे वास्तव्य करतात.ते पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यायामध्ये प्रभारी प्राचार्य होते.त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जुलै २०२३ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन पूर्णवेळ भाजपचे काम केले ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button