एन यू बी सी आयोगाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांची नियुक्ती
अकलूज प्रतिनिधी
अकलूज : National Union of Backward Classes SC ST and Minorities अर्थात एन् यू बी सी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.जगदीश यादव यांच्या हस्ते एनयूबीसी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश एन यू बी सी च्या राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील बहुजन सेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आली.
मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क पुणे येथे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना, एनयूबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेत हे पद नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस्.गीता, संग्रामनगर- अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ(सचिन) बळवंत रासकर, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, विलासनंद विठ्ठल गायकवाड यांच्यासह शेतकरी संघटना व वीस राज्यातील एनयुबीसी चे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड क्लासेस एससी एसटी अँड मायनॉरिटीज अर्थात एनयूबीसी च्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी अकलूज येथील नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजले पासून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
“एनयुबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा पदभार तीन महिन्यापूर्वी स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष नामदार जगदीश यादव यांनी महाराष्ट्रातच सर्वप्रथम लावलेल्या पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये श्री नायकुडे यांना महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा क्षण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेची राष्ट्रीय आयोगाने घेतलेली दखल आहे. अशी भावना पत्रकार बांधवांमध्ये निर्माण झाली आहे”. असे मत ज्येष्ठ विचारवंत निवृत्त संपादकांनी व्यक्त केले आहे.