कृष्णानंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती-अकलूज येथे शुक्रवार दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी *भारतीय प्रजासत्ताक दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी शिक्षक यांची प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रम स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच कृष्णानंद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. वेताळ काटकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. श्री. वेताळ घुले साहेब, मा. श्री. ज्ञानदेव वाघ साहेब, मा. श्री. दादा यादव साहेब तसेच कृष्णानंद सोशल फाउंडेशन चे उपाध्यक्ष मा. श्री. श्रीकांत यादव साहेब, बागेवाडी गावचे पोलीस पाटील मा. श्री. बागडे साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भानुदास आसबे सर हेही उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, व ध्वजगीत गायन करण्यात आले व भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयातील स्काऊट व गाईड टूपचे अतिशय शानदार असे संचलन सौ मोरे मॅडम व श्री गुरव सर व सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. वेताळ काटकर साहेब यांनी दोन्ही ग्रुपची मानवंदना स्वीकारली. यानंतर घोष पथकाच्या तालावरती सर्वच विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व एक सूत्रीपणाने सामुदायिक कवायत सादर केली. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी आपले प्रास्ताविक करून अध्यक्ष निवड केली. यानंतर विद्यालयातील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना सहशिक्षक श्री. ढोले सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थिनींनी केरळमधील कोणम कृती गीत सादर केले. या विद्यार्थिनींना श्री. आठवले सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हलगीच्या तालावर लेझीम चे बहारदार सादरीकरण केले व प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना श्री. अनगळ सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक विभागातील कु. श्रुतिका पांडोळे, कु. श्रेया काटकर, कु. सृष्टी माने, कु. श्रावणी चव्हाण, कु. श्वेता जाधव, कु. सृष्टी वाघमारे यांनी आवेशपूर्ण भाषण करून भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी कृष्णानंद सोशल फाउंडेशन च्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीतील प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना वही, कंपास, पेन व प्रशस्तीपत्र यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माननीय श्री. वेताळ काटकर साहेब यांनी सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक जाहीर केले. शासन आदेशानुसार सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व पालक यांना *तंबाखूमुक्त राहण्याची शपथ* देण्यात आली. “सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा” या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री संतोष अनगळ सर व सहशिक्षिका सौ. पुष्पा चेमटे मॅडम यांनी केले.