आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा करा .. पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ यांचे नागरिकांना आवाहन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटीचे सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य,पोलीस पाटील,सरपंच सदस्य पोलीस मित्र सेवाभावी संस्था, गणेश मूर्तिकार व सर्व वाद्यवादक ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दत्त मंदिर हॉल माकूणसार येथे पार पडली.

या बैठकीला पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ व केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी आणि सर्व केळवा सागरी पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राहुळ यांनी आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शक सूचना करून आगामी गणेशोत्सव सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून ठेवून अफवा,चुकीची माहिती किंवा समाजात तेढ निर्माण होतील असे देखावे उभारू नये अशा मार्गदर्शक सूचना करून आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.



