शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील टेंभीखोडावे गावात रूट मार्च

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

आगामी गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन टेंभीखोडावे गावच्या हद्दीत शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनांचे पालन करून केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने हा रूट मार्च काढण्यात आला होता .

या रूट मार्चचे नेतृत्व केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी केले असून सदरचा रूट मार्च 10.00 वाजता टेंभीखोडावे नाका- मुख्य गाव- हनुमान मंदिर अश्या मार्गाने काढण्यात आला होता.या रुटमार्च करीता 01 पोलीस अधिकारी व 21 पोलीस अंमलदार, एसएलआर- 01, अ‍ॅण्टी राईट गन -01, बाराबोअर – 01, हेल्मेट- 20 लाठी-20 ,ढाली- 05 आणि 02 सरकारी वाहनासह सकाळी 10. ते 11.30 वाजेपर्यंत काढण्यात आला होता.

सणासुदीच्या काळात समाजातील नागरिकांची सुरक्षितता व शांतता अबाधित राहावी तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून हा रूप मार्च काढण्यात आला होता असे केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी टाईम्स 9 न्यूज नेटवर्क यांच्याशी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button