पालघर जिल्ह्यातील केळवे दसरमाळा येथील स्मशानभूमीची वारंवार मागणी करून देखील स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार यांचे दुर्लक्ष

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवे गाव हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे अश्या या गावात एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्मशानभूमीचा अभाव हा केळव्यातील गावकऱ्यांसाठी एक मोठा अडथळा बनला आहे. स्थानिक प्रशासन, आमदार, खासदार यांचे दुर्लक्ष या समस्येवर कायदा आणि सामाजिक आवश्यकतांची पातळी कमी करत आहे.
केळवे सारख्या पर्यटन स्थळावर, जिथे रोज अनेक पर्यटक येतात अशा ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था न असणे ही एक गंभीर बाब आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाविरुद्ध संताप जनक भावना व्यक्त केला जात आहेत
प्रशासनाने मुंबई-बडोदरा बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले असताना स्थानिक नागरी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. याबद्दल केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा मनसेचे पालघर तालुका अध्यक्ष संदीप किणी यांनी खंत व्यक्त केली आहे.

केळवे ग्रामपंचायत हद्दीत
दसरमाळा केळवे, जोगाळे, मांगेल आळी, सुभाषनगर-भंडारआळी, केळवे बीच मध्यवर्ती या गावात आजही अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीचा अभाव आहे
स्थानिक प्रशासन आणि विधानसभा व लोकसभा लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना देखील अंतिम संस्कारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने या भागातील नागरिकाकडून विद्यमान आमदार खासदार व प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
केळवे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावात अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे या भागातील नागरिकांना भर पावसात अंत्यविधी करावा लागतो ही एक दुर्दैवी खेदाची आणि दुखत भयानक परिस्थिती आहे.
केळवे ग्रामपंचायत-सरपंच संदीप किणी



