करमाळा शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वार्डात नवीन विधन विहीर घ्यावी,,, मा. नगरसेविका राजश्री माने यांची मागणी
करमाळा:-प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
सध्या उन्हाळा मोठया प्रमाणावर चालु झालेला आहे. त्यामध्ये करमाळा शहरास अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असून तो देखील नियमित होत नाही. सध्या ४ ते ५ दिवसाने पाणी पुरवठा होत आहे. रमजानचा महिना चालू असून करमाळा शहरामध्ये मोठया प्रमाणावर मुस्लीम बांधव राहत आहेत. पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने शहरातील नागरिकांना मोठया प्रमाणावर त्रास होत आहे. त्यासाठी करमाळा शहरात प्रत्येक प्रभागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन विंधन विहिर घेणेआवश्यक आहे. तसेच शहरात पाण्याचे टँकर चालू करुन प्रत्येक प्रभागात, वार्डमध्ये पाण्याचे टँकर चालू करावे जेणेकरुन नागरिकांचे पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल व शहरात होणारी खाजगी पाणी पुरवठादारांकडून होणारी आडवणूक बंदहोईल. तरी शहरात लवकरात लवकर विंधन विहिर घेण्यात यावे तसेच पाण्याचे टँकर चालू करावे असे निवेदन करमाळा नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री दत्तात्रय माने यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिले आहे.