संपादकीय

एक लाख एकर क्षेत्र बागायत – एक लाख मते ‘ पाटील गटाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन संकल्प

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील एक लाख एकर जिरायती शेती बागायत करुन दाखविण्याची धमक केवळ माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यामध्ये असुन बळीराजाने मतांची ताकद दिल्यास सन २०२९ पर्यंत करमाळा तालुक्यातील एक लाख क्षेत्र कायमस्वरूपी ओलीताखाली येईल असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला. पाटील गटाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘ एक लाख एकर क्षेत्र बागायत – एक लाख मते ‘ या नवीन संकल्पाची घोषणा तळेकर यांनी केली. याबाबत सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१४ ते २०१९ दरम्यान करमाळा तालुक्यातील जिरायती क्षेत्र बागायत करण्याचे धोरण अवलंबिले होते. यातुनच एकोणीस वर्षे रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे, सीना-कोळगाव उपसा सिंचन योजनेची चाचणी यशस्वी करुन दाखविणे, जलयुक्त शिवार योजनेतुन बंधारे, ओढा खोलीकरण, तलावांतील गाळ काढुन तलाव पुनर्बाधणी करणे, कुकडीची पाच वर्षात सतरा आवर्तने मिळवून देणे आदि सिंचनासाठी पुरक असलेली कामे करुन दाखविली. आता सन २०२४ ते २०२९ पर्यंत खास करुन बळीराजाने मनावर घेऊन नारायण (आबा) पाटील यांना परत एक संधी दिली तर करमाळा तालुक्यातील एक लाख एकर क्षेत्र कायमस्वरूपी ओलीताखाली आणण्याचे काम नारायण आबा पाटील करुन दाखवतील. यात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम पुर्ण करुन एकुण २५ हजार क्षेत्र ओलिताखाली आणणे, कुकडीच्या लाभ क्षेत्रातील ६५ हजार क्षेत्राचे उद्दीष्ट पुर्ण होऊ शकत नाही. यामुळे नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन या ६५ हजार एकर जिरायती भागास कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळवून देणे, वडशिवणे तलावात उजनीचे पाणी कायमस्वरूपी आणुन पाच हजार एकर क्षेत्र बागायत करुन दाखविणे, बोरगाव सह सात गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देणे, कृष्णा-मराठवाडा बोगद्यामधून करमाळा तालुक्याच्या हद्दीतील योजनेच्या नजीक असलेल्या गावांना शेतीसाठी उचलपाण्याचे कायमस्वरूपी परवाने मिळवून देणे, दहिगाव उपसा सिंचन योजनेत झरे, पोफळज, देवळातील उर्वरित भाग, सालसे, कोंढेज, मलवडी, निंभोरे, साडे, वरकुटे, नेरले, घोटी, आळसुंदे, पाथुर्डी आदि वंचित भागांतील जलसाठ्यांचा समावेश करुन शेतीसाठी पाणी मिळवून देणे यासह सिंचनवाढीसाठी आणखी बरेच उद्दीष्ट आणि उपाययोजना करण्याचा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा मानस असुन मतदारसंघातील शेतकऱ्यांनी एक लाख मतांचे पाठबळ दिल्यास हि सर्व कामे सन २०२४ ते २०२९ दरम्यान मार्गी लागतील. माजी आमदार नारायण आबा पाटील हे जलनायक आहेत आणि त्यांच्यामध्येच करमाळा तालुक्यातील जिरायती भागास बागायती क्षेत्र करुन दाखविण्याची क्षमता आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पाटील गटाने जाहीर केलेल्या या संकल्पास बळीराजा नक्कीच पाठींबा देईल असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button