सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ PROTECTION OF HUMAN च्या नवीन संपर्क कार्यालयांचे थाटात उद्घाटन करण्यात आले
अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघांने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवीन संपर्क कार्यालयांचे उद्घाटन पश्चिम भारत अध्यक्ष, अमोल बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले या नवीन ऑफिसला अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री किशोरसिंह (दादा) माने पाटील यांनी भेट दिली,
पुढे बोलताना अमोल माने यांनी सांगितले की या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजातील ज्येष्ठ नागरिकांनाचा फेटा बांधून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, संघ संस्थेची माहिती देताना असे सांगितले की ही सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ मानव अधिकारचे होणारे उल्लंघन थांबवणे, शिक्षणासाठी समान अधिकार मिळवून देणे,अन्याय विरोधात आवाज उठवाने,महिला अत्याचार विरोधात लढा देणे,लोकांना जागृत करणे,बालकामगार शोषण विरोधात आवाज उठवने,भ्रष्टाचार विरोधी कारवाई करणे
गरिबांना मदत करणे,पर्यावरणाचे रक्षण करणे धर्म संस्कृतीचे रक्षा करणे, असे एका ना अनेक समाजातील गोरगरीब लोकांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात ही संघ संस्था महाराष्ट्र व देशातील विविध राज्यांमध्ये काम करत आहे, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांनी सर्व पदाधिकारी यांना वेळो वेळी मार्गदर्शन केले आहे, संपर्क कार्यालयाची मागणी गरीब लोकांतून होत होती लोकांच्या मागणीला आज यश प्राप्त झाले आहे असे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी सांगितले या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित माळशिरस तालुका अध्यक्ष तानाजी वायदंडे, माळशिरस तालुका उपध्यक्ष विष्णू केंगार,
संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके, पुणें जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगीताई मोरे,माळशिरस तालुका अध्यक्ष शोभाताई दळवी, महिला उपाध्यक्ष अश्विनीताई पांढरे, माळशिरस महिला सरचिटणीस वंदनाताई तिकोटे,सदस्य अर्जुन मदने,रावसाहेब वायदंडे,भीमराव मिसाळ, स्वाती अमोल माने, राणी पाकले, नंदा बाळासाहेब माने सर्व संघ संस्थेचे सदस्य व सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.