महाराष्ट्र

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी.

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद,बेंगलोर, चेन्नई असा मध्य रेल्वे मार्ग गेला आहे रेल्वे मार्गाच्या उत्तर दिशेला उमरड,करमाळा,राशीन,भैरवनाथ साखर कारखाना व दक्षिण दिशेला केडगाव, चिखलठण, कुगांव,शेटफळ,धैगाव आशी विभागणी झाली आहे
भुयारी मार्ग झाला पाहिजे या साठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम,मा.सरपंच संदीप मारकड,चंद्रशेखर पाटील,डॉ.शेळके यांनीं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची अकलूज येथे भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली

रजाभाऊ कदम यांनीं खासदार मोहिते पाटलांना सांगितले उमरड ते केडगाव भुयारी मार्ग झाल्यास केडगाव,चिखलठण,कुगांव,धैगाव,शेटफळ या गावच्या १५ हजार लोक संखेला उमरड मार्गे करमाळा, राशीन,भिगवण,भैरवनाथ साखर कारखाना,माकाई साखर कारखाना, आंबालिका साखर कारखाना,बारामती अग्रो साखर कारखाना इकडे जाण्या येण्या साठी व ऊस वाहतूकी साठी जवळचा मार्ग होणार आहे ३० किलोमीटर बचत होणार आहे सर्व म्हणणे खासदार मोहिते पाटलांनी ऐकून घेऊन प्रयत्न करू अशे आश्वासन दिले

त्याचं प्रमाने उमरड येथील आरोग्य केंद्राला डॉकटर कर्मचारी उपलब्ध करून दवाखाना सुरु करावा,अहिल्या देवी टेकडीवरती सभामंडप ध्या,केडगाव उमरड पंतप्रधान सडक योजेनेतुन निधी ध्या अशा विविध विकास कामाची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button