आकड्यांचे जादुई खेळ ,,,,,,, स्वभ्रमाच्या सापळ्यात अडकलेले विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर,,,,,,,,,

अकलूज प्रतिनिधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न :- 9960178213
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~तुमच्यात धमक असेल तर मला अडवून दाखवा ,,,,,,! असे जाहीर आव्हान आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब व त्यांचे आडून मोहिते पाटील यांना ही देणारे माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खा रणजितसिंह निंबाळकर ,,, त्यांचा तो आविर्भाव , आणि त्यांचीच री ओढणारे त्यांचे अंध भक्त 2019 च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी सांगून स्वतः ला भ्रमात ठेवत नसून तो भ्रम भाजपा सारख्या पक्षात आणि सर्व सामान्य मतदारात ही पसरवत असल्याने त्याचेतील खरे वास्तव जनतेला , पक्षाला ही उकलून दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे .काल दिनांक 23/2/2024रोजी भाजपा तील राज्य पातळीवरील एक प्रमुख नेता आणि माझी भेट झाली एकंदरीत त्यांनी माझ्या कडून आढावा घेतला , आणि तो घेत असताना त्यांनी मला कांहीं प्रश्न विचारले .ज्याची स्पष्ट उत्तरे मी दिली .जे ठोकताळे विद्यमान खा महोदयांनी स्वतः शी बांधलेले आहेत आणि तेच ठोकताळे मोहिते पाटील यांना विरोध करणाऱ्या गटाच्या लोकांनी बांधलेले आहेत , त्या आधारे मोहिते पाटील विरोधात गेले तरी राजकीय समीकरणात कोणतीही घट होत नाही , असा गणितीय भागाकाराची ते वैचारिक मांडणी करत राहतात , आणि खरी गंमत इथेच आहे की , रेशीम किडा ज्या प्रमाणे स्वतः भोवती कुंपण घालून स्वतः ला बंद करून आत्मघात करून स्वतःचेच कोषात तो गुदमरून जातो तशी गत विद्यमान खासदारांची झाली आहे अधिक शाब्दिक वेल्हाळ न लावता आपण त्यांच्या मूळ युक्तिवादाकडे जाऊ तो पाहू , आणि नंतर मूळ आकडेवारी आणि त्यातील फसवा भ्रम ही पाहू त्यांचे अनुमाना नुसार मोहिते पाटील यांचा गट विरोधात गेला तरी त्याची नुकसान भरपाई शिंदे बंधू करतील आणि माळशिरस तालुक्यातील त्यांचे राजकीय पारंपारिक शत्रू त्यांना लीड बहाल करतील व विद्यमान खासदार पुन्हा एकदा त्याच मताधिक्याने निवडून ही येतील आत्ता आपण आकडेवारी कडे जाऊ 2019साली संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी दुरंगी लढत झाली होती करमाळा 1),,,,, रणजितसिंह निंबाळकर 71,503मते संजय मामा शिंदे 1,0 1,932
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~संजय मामा लीड 30,429
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
2). माढा रणजितसिंह निंबाळकर 98,562मते संजय मामा शिंदे 1,05,067मते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संजय मामा लीड 6,505
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
3). सांगोला रणजितसिंह निंबाळकर 78,746 मते संजय मामा शिंदे 82,120 मते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ संजय मामा लीड 3,374
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याचा अर्थ संजय मामा शिंदे यांना करमाळा माढा व सांगोला या विभागातून 40,308 मताचे लीड मिळाले आणि आ बबनदादा शिंदे विद्यमान खासदारांना 2लाख हून अधिक लीड देण्याची जाहीर भाषा करतात याला म्हणायचे “एक हात लाकूड ,,,,, नऊ हाथ ढलपी”” 😂😂😂~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~4). माळशिरस रणजितसिंह निंबाळकर 1,43, 022 मते संजय मामा शिंदे 42,395 मते ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ रणजितसिंह निंबाळकर लीड 100,627 मते ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~या ठिकाणी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की , लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व उत्तमराव जानकर हे दोन्ही गट भाजपचे बाजूने होते संजय मामा शिंदे यांना या तालुक्यात मिळालेली 42,395मते ही राष्ट्रवादी काँग्रेस , व काँग्रेस पक्षाची स्वंतत्र मते आहेत शंकर नाना देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस ऍड आ राम हरी रुपनवर आप्पा व आमच्या सारखे कांहीं लोक , कमी साधने आणि कमी निवडणूक यंत्रणा या आधारे मिळवलेली मते आहेत ,,,,, आणि हीच मते विधानसभा निवडणुकीत उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवल्या नंतर त्यांना मिळाल्याने ती 100,917 इतकी झाली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
म्हणून ,,,,,, 100,917 – 42,395
58,522
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इतकीच मते उत्तमराव जानकर यांच्या गटाकडे राहिलेली आहेत , त्यांच्या मूळ गटातून के के पाटील सारखे नेते बाहेर पडल्याने किमान 10हजार लोकांचा गट मूळ गटातून बाहेर गेल्याने हे संख्या बळ घटलेले आहे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सातारा विभाग
5),,,,,, फलटण रणजितसिंह निंबाळकर 94,879मते संजय मामा शिंदे 93,666 मते ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खासदार यांच्या स्वतः चे होम ग्राउंड वर त्यांचे लीड 1,213 😂😂😂~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~वाचकांनी ही बाब लक्षात घ्यावी की , ही संजय मामा यांना मानणारी व्यक्तिगत मते नाहीत तर ही मते आहेत , आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब व संजीव जी नाईक निंबाळकर यांची ,,,,~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
6),,,,,,,, माण ~खटाव रणजितसिंह निंबाळकर 96,476 संजय मामा शिंदे 73,261
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~रणजितसिंह निंबाळकर लीड 23,215
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या साऱ्याचा एकत्रित विचार केला तर रणजितसिंह निंबाळकर यांना त्यांच्या सातारा विभागातून 24,428मताचे लीड मिळाले तर संजय मामा शिंदे यांना माळशिरस वगळता माढा , सांगोला , करमाळा मिळून 40,308 मताचे लीड मिळाले याचाच अर्थ माळशिरस वगळता संजय मामा शिंदे यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचे विरुद्ध 15,880 मताचे लीड घेतले , ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या गत निवडणुकांतील आकडेवारी पाहिली तर 1980साली शिडी चिन्हावर निवडणूक लढवून ही आदरणीय विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांनी पहिल्याच पदार्पणात 64,086मते मिळवून विजय संपादित केला होता 1985साली काँग्रेस पक्षाकडून त्यांनी 89,397मते घेऊन विजय मिळवला होता 1990साली84,747तर 1995साली 84, 709 मतांनी त्यांनी विजय मिळवला होता 1999साली यात किंचित घट झाली व 76,576मताने ते विजयी झाले 2004साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि 1,32,543 मतांनी ते विजयी झाले मतदार संघाच्या पुनर्रचना मुळे हा मतदार संघ राखीव झाला 2009साली कै. आ .हनुमंत राव जगन्नाथ डोळस साहेबयांनी तब्बल 82,360मते घेतलीतर 2014साली 77179 मते घेतली काँग्रेस पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने आणि अनेक रीपाई सारख्या उमेदवारांनी मत विभाजन घडवून आणल्याचे हे मताधिक्य घटल्याचे दिसते 2009सालची निवडणूक वास्तव बल दर्शवते कै. आ हनुमंत राव डोळस साहेब यांना 82,360तर उत्तमराव जानकर अपक्ष यांना 66,134 मते मिळाली प्रा मार्तंड रामचंद्र साठे अपक्ष 6,443मते मिळाली 2019साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ रामभाऊ विठ्ठल सातपुते हे नवखे उमेदवार असताना ही त्यांनी 1,03,507मते मिळवली , यातील मूळ भाजप ची तत्कालीन मंत्री दिलीप जी कांबळे साहेब यांना प्राप्त झालेली 5000मते व नव्याने के के पाटील गटाच्या रूपाने भाजपा त अस्तित्वात असलेला गट 10,000मताचा गठ्ठा धरला तरी ही मोहिते पाटील यांना मानणारा सर्वात प्रबळ असा मतदार जो 80हजार ते 85हजार मताची शक्ती आज ही राखून आहे , आणि ती ही स्वतः चे होम ग्राउंड वर तेंव्हा फुकाच्या गमजा कोणी मारू नये ,,,, इतकाच इशारा आम्ही देत आहोत भाजपला संघर्ष नको आहे म्हणून तिसरा पर्याय देण्याची नाटके मतदार व मोहिते पाटील समर्थक या नात्याने आम्ही खपवून घेणार नाही , मी स्वतः मोहिते पाटील यांच्या संपर्कात नाही , मला त्यांच्या परवानगी ची गरज ही वाटत नाही त्यांनी ही कांहीं तांत्रिक अडचणीचे कारण सांगून त्यांचे व्यत रिक्त तिसऱ्या उमेदवारास मते देण्याचे आवाहन केले तरी ही आम्ही तो आदेश पाळणारच नाही , मतदार म्हणून तो आमचा अधिकार आहे आणि तो शाबूत आहे , एवढंच आम्ही निर्वाणी चे सांगत आहोत तूर्त इतकेच,,,,,,,