विशेष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने अकलूज अशोका चौक (जयसिंह चौक) ते गांधी चौक या ठिकाणी असणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले
अकलूज प्रतिनिधी
रस्त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांना त्या ठिकाणावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. यावर पर्यायी मार्ग काढला नाही तर 26 फेब्रुवारी रोजी त्या रस्त्यावरती झोपा काढू आंदोलन करणार आहोत. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे,युवक उपाध्यक्ष जाकीर भाई शेख,शहर प्रमुख सुरेश भाऊ गंभीरे,मैत्री प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के, दत्ताभाऊ वसव आदी उपस्थित होते.