बैलाची कत्तल करून फरार झालेल्या मुख्य आरोपीच्या केळवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी आवळल्या मुसक्या

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील उसरणी गावाशेजारी बैलाची कत्तल करून फरार झालेल्या मुख्य दुसऱ्या आरोपीला केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाने सापळा रचून मुंबई मालवणी येथून गुरुवारी अटक केली आहे.

भादवे गावाच्या पुढे जाताना उसरणी बस स्टॉप जवळ काही अज्ञात इसम बैलाची कत्तल करणार आहेत अशी गोपनीय माहिती महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती सदस्य राजेश पाल यांनी 18 एप्रिल रोजी केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांना दिली होती.या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले आणि पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, पोलीस शिपाई जयदीप सांबरे, पोलीस शिपाई गावित, पोलीस हवालदार कामडी, महेंद्र जाधव, सानप, आणि राजेश पाल व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाड टाकली होती. यावेळी घटनास्थळावरून कापलेला बैल, त्याचे मुंडके व पाय आणि रक्त पोलिसांना दिसून आले हे कृत्य करणाऱ्या भादवे गावातील राजेश ठाकूर या आरोपीला घटनास्थळी अटक केल्यानंतर त्याचा दुसरा साथीदार इम्रान कुरेशी हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता.
या फरार आरोपीला गुरुवार दिनांक 7 मे रोजी मुंबई मालवणी येथून सापळा रचून केळवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाने अटक केले आहे.
या आरोपीला केळवा सागरी पोलिसांनी शुक्रवारी पालघर कोर्टात हजर केले असता त्याला पालघर कोर्टाने 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे



