महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मौजे हिसरे येथे बँक ऑफ इंडिया शाखा कोळगाव व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती यांच्यावतीने महिला स्वयंसहायता समूहांना महिलांना कर्ज वाटप मेळावा संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मौजे हिसरे येथे बँक ऑफ इंडिया शाखा कोळगाव व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती करमाळा यांचे वतीने महिला स्वयंसहाय्यता समूहाना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक श्री.योगेश जगताप साहेब, व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक साक्षरता सल्लागार श्री.हनुमंत भालेराव सर उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे चे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष राऊत साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.तालुका अभियान व्यवस्थापक श्री.जगताप साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थित महिलांना बँक कर्ज परतफेड करणे, व्याज अनुदान योजना, विमा योजना, विविध शासकीय योजना याबाबत माहिती दिली.
महिलांनी घेतलेल्या कर्जातून व्यवसाय सुरू करून आपला आर्थिक विकास साधावा तसेच बँकेने ज्या विश्वासाने कर्ज दिले आहे ते कर्ज नियमित परतफेड करून बँकेच्या विश्वासास तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया चे आर्थिक साक्षरता सल्लागार श्री हनुमंत भालेराव सर यांनी बँकेच्या वेगवेगळ्या योजना, व्याज परतावा, वेळेवर परफेड करण्याचे फायदे,फसव्या स्कीम याविषयी माहिती दिली.
अभिनव भारत समाज सेवा मंडळ यांच्या वतीने पोषण परसबाग कीट चे वाटप करण्यात आले.यावेळी श्री संतोष राऊत साहेब यांनी सेंद्रिय पालेभाज्या यांचे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्व आहे हे सांगितले.वाटप केलेले कीट ची लागवड करून त्याचे सेंद्रिय खत वापरून जोपासना करून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्याबाबत जागरूकता बाळगावी असे मत मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक श्री.आकाश पवार सर, व्यवस्थापक श्री.शंकर येवले सर, श्री.हनुमंत पवार, जन CRP सारिका पवार, CTC राणी निंबाळकर, पशू सखी संगीता ओहोळ , लिपिका मयुरी जगदाळे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास ग्राम संघाचे पदाधिकारी व समूहातील महिला यांची उपस्थिती होती.