शहर

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे सावधान – अकलूज पोलीस करणार कारवाई

प्रतिनिधी…रियाज मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 9921500780

अकलूज परिसरातील रस्त्यावरती वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर बरेच लोक करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातास प्रतिबंध करण्याकरीता लोकांचे जिवीताची व वाहन चालकाची सुरक्षीतता अबाधीत राखण्यासाठी वाहन चालकाविरुध्द कारवाई करण्याची मोहिम अकलुज पोलीसांनी सुरु केली आहे.

दिनांक 08/12/2023 रोजी अकलुज शहर हद्दीत वाहन चालविताना वाहन चालक मोबाईल वर बोलत असताना मिळून आल्याने भारतीय दंड सहिंता कायदा कलम 336 प्रमाणे 17 वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याशिवाय बिगरनंबरचे वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, विनासिटबेल्टचा वापर करणे, ट्रिपलशिट, वाहनांचे सायलन्सर वाजवणे तसेच मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे वाहन चालकांविरुध्द चालू वर्षात आतापर्यंत मोटार वाहन कायदयाखाली 3,940 केसेस करुन एकुण 25,49,200/- रुपये दंड करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण, डाॅ. सई भोरे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज, दिपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब पानसरे, पोलीस अंमलदार विशाल घाटगे, विक्रम घाटगे, संजय खैरे, प्रविण हिंगणगांवकर, सोमा माने व वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार हनुमंत झिंजे, इन्नूस आतार, शब्बीर नदाफ यांनी कारवाई केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button